शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया उद्याेगातून आत्मनिर्भरतेसाठी मिळणार 10 लाखांपर्यंतचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात ७८ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वनाेपजाची उलाढाल सुमारे एक हजार काेटींच्या घरात आहे. माेहफुल, बेहडा, डिंक, चाराेळी, टाेळी अशा प्रकारच्या काेणत्याही वनाेपजावर प्रक्रिया करणारे उद्याेग स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात चांगला वाव असल्याने या याेजनेंतर्गत अशा प्रकारचे उद्याेग निर्मितीसाठी अनुदान दिले जाणार आहे. कमीत कमी ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक स्तरावर हाेणाऱ्या कृषी व इतर उत्पादनांवर प्रक्रिया उद्याेग स्थापन करणाऱ्याला अर्थसाहाय्य देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारतअंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्याेग ही याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत जिल्ह्याला १४० उद्याेग निर्मितीचे टार्गेट देण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्यात ७८ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वनाेपजाची उलाढाल सुमारे एक हजार काेटींच्या घरात आहे. माेहफुल, बेहडा, डिंक, चाराेळी, टाेळी अशा प्रकारच्या काेणत्याही वनाेपजावर प्रक्रिया करणारे उद्याेग स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात चांगला वाव असल्याने या याेजनेंतर्गत अशा प्रकारचे उद्याेग निर्मितीसाठी अनुदान दिले जाणार आहे. कमीत कमी ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. 

काेणाला घेता येणार लाभ वैयक्तिक, संस्था, बचत गट यांना या याेजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. अर्ज  कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने  जिल्हाभरात ९ डिस्ट्रीक्ट रिसाेर्स पर्सन नेमले आहेत. कृषी विभागाचे कर्मचारीही याबाबतची प्राथमिक माहिती देऊ शकतील. 

असे मिळणार अनुदान यामध्ये प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या १० टक्के लाभार्थी हिस्सा, ५५ टक्के बँक कर्ज, ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याचे अधिकार जिल्हास्तरावर आहेत. एखादा माेठा प्राेजेक्ट असल्यास त्याला दाेन काेटी रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागेल. आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ जणांनी अर्ज केले आहेत. २ अर्ज बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्याेग याेजना ही अतिशय चांगली याेजना आहे. या याेजनेत सुमारे ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. साेबतच बँक कर्जासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे. ज्यांना उद्याेग स्थापन करण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच अर्ज करावा. बेराेजगार व्यक्ती, बचतगट, संस्था यांना चांगली संधी चालून आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. - भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, गडचिराेली.

 

टॅग्स :bankबँकgovernment schemeसरकारी योजना