चामोर्शी व आष्टीत बसस्थानकाचा मार्ग सुकर

By Admin | Updated: April 28, 2016 01:02 IST2016-04-28T01:02:03+5:302016-04-28T01:02:03+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसस्थानक उभारणी करण्याकरिता चामोर्शी आणि आष्टी या ठिकाणी जागा मिळवून देण्यात आली आहे.

The route of Chamorshi and Ashtasthan bus station | चामोर्शी व आष्टीत बसस्थानकाचा मार्ग सुकर

चामोर्शी व आष्टीत बसस्थानकाचा मार्ग सुकर

जागा उपलब्ध झाली : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची मासिक बैठकीत माहिती
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसस्थानक उभारणी करण्याकरिता चामोर्शी आणि आष्टी या ठिकाणी जागा मिळवून देण्यात आली आहे. या बसस्थानकाची उभारणी लवकरच सुरू करावी, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाला केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी मासिक जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांता दैंठणकर उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी जिल्ह्यात असणाऱ्या गोदाम संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत आठने वाढ झाली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीत रस्ते पूर्णपणे वाहून जाण्याच्या घटना घडल्या. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ६ कोटी १४ लक्ष रूपये निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची साधारण २०० कामे येणाऱ्या काळात होणार आहे. हे सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश आव्हाड यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर कामकाजाची काळजी घेऊन वेळेत कामे करावीत आणि विभागामधील समन्वय वाढवावा, त्यामुळे प्रशासन गतिमान होईल. पद आणि दर्जा याच्या पलीकडे जाऊन अधिकाऱ्यांनी काम केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The route of Chamorshi and Ashtasthan bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.