आरक्षणासाठी आरमोरीत चक्काजाम

By Admin | Updated: August 21, 2015 01:54 IST2015-08-21T01:54:51+5:302015-08-21T01:54:51+5:30

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पुढील वर्षांसाठी जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करावे, .....

Round-the-clock reservation | आरक्षणासाठी आरमोरीत चक्काजाम

आरक्षणासाठी आरमोरीत चक्काजाम

बुधवारी पाळला कडकडीत बंद : शिवसेना व युवासेनेचा पुढाकार; शेकडो युवकांची उपस्थिती
आरमोरी : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, पुढील वर्षांसाठी जिल्ह्यात निवड मंडळ स्थापन करावे, वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकर भरतीत सर्वच जातीच्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, पेसा कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्या आदी मागण्यांसाठी बुधवारी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने आरमोरीत बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर दुपारी १२ वाजता शहरातील बर्डी टी-पार्इंटवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम व युवा सेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे यांच्या नेतृत्त्वात एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे आरमोरी-नागपूर, देसाईगंज मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. १६२ आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.
बुधवारी शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरमोरी शहरात रॅली काढून आरमोरी शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद केली. दुकानदार, पानठेले चालक, व्यापारी, चहा दुकानदार यांनी सुद्धा बाजारपेठ १०० टक्के बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. या आंदोलनाला सराफा असोसिएशन आरमोरी, किराणा दुकानदार संघटना व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवून आंदोलनात सहभागी झाले.
दुपारी १२ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, पेसा कायद्याच्या जाचक अटी रद्द झाल्या पाहिजे, आदी बाबतच्या घोषणा देण्यात आल्या. तब्बल एक तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर पोलीस प्रशासनाने १६२ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका केली.
आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य छाया कुंभारे, सुनंदा आतला, सकून नंदनवार, कालिंदा कडवे, मंजुळा पदा, कवडू सहारे, विजय मुरवतकर, प्रशांत सोनकुवर, उमेश गजपुरे, मधुसुधन चौधरी, किशोर मांदोळे, भरत जोशी, प्रशांत किलनाके, भूषण सातव, संतोष मारगनवार, दिनेश भडके, अक्षय धकाते, शैलेश चिटमलवार, अक्षय चाचरकर, मनोज बनपूरकर, किशोर कांबळे, गणेश खोब्रागडे, पंकज ठेंगरी, संदीप खागरे, तुषार खापरे, कुणाल भरणे, लोमेश खोडे, संजय लोणारे, स्वप्नील हेमके, प्रकाश गणवीर, पांडुरंग मेश्राम, आशिष जोध, नितीन जोध, केशव ठाकरे, रूपेश बेहरे, दीपक हेडाऊ, जयंत दहिकर, पंकज नाकाडे, वेगुनाथ काळबांधे, कोटू कुमरे, रूपेश खापरे, मयुर बेहरे, वैभव बेहरे, प्रवीण दुमाने, योगेश देवीकर, माणिक भोयर, अंकित तुमसरे, अविनाश डुंबरे, मिलींद खानदेशकर, भगवान गुरनुले, अक्षय बागडे, अंकित हेमके, पं. स. सदस्य नानू चुधरी, कालिदास सेलोटे, आनंदसिंग चावला, ज्ञानेश्वरी चुधरी, संकेत गजपुरे, यज्ञेश गांगवे, संकेत सेलोकर, रामदास पिल्लारे, धनराज खोब्रागडे, आशिष कांबळे, वसिम शेख, संदीप खागरे, नयन सेलोकर, घनश्याम कोलते, जीतू सानेटक्के, कुणाल प्रधान, ललीत मने, पराग बांगे, सचिन पराते, अमोल ढोंगे, विठ्ठल दुमाणे, मच्छिंद्र डोंगरे, मनोज राजगडे यांच्यासह शेकडो शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Round-the-clock reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.