कुत्र्यांच्या पाठलागात रोही जखमी
By Admin | Updated: July 12, 2014 01:12 IST2014-07-12T01:12:03+5:302014-07-12T01:12:03+5:30
कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे रोही (नीलगाय) पोर्ला शेतशिवारात जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शेतात काम करीत असलेल्या सुज्ञ शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे रोहीचे प्राण वाचले.

कुत्र्यांच्या पाठलागात रोही जखमी
पोर्ला : कुत्र्यांनी केलेल्या पाठलागामुळे रोही (नीलगाय) पोर्ला शेतशिवारात जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शेतात काम करीत असलेल्या सुज्ञ शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे रोहीचे प्राण वाचले.
पोर्ला वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगलात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या जंगल परिसरात जंगली रोहीचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग केला. यात कुत्र्याच्या पाठलागातून स्वत:ला वाचविण्यासाठी रोहीने प्रयत्न केला. दरम्यान शेत संरक्षणासाठी लावलेल्या तारांच्या कुंपनात रोही अडकला. यात तो जखमी झाला. रोहीच्या तोंडाला व पायाला दुखापत झाली. सदर घटना बघताच परिसरातील शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. तत्काळ पोर्ला वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक नंदेश्वर, क्षेत्र रक्षक मुकरू किनेकर यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमी रोहिला उपचारासाठी पोर्लाच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात नेले. दवाखान्यात पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके यांनी जखमी रोहीवर उपचार केला. जखमी रोही अडीच वर्ष वयाचा आहे. त्याला पोर्ला वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११ च्या राखीव वनक्षेत्रात सोडण्यात आले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)