अंगणवाडीचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:14 IST2018-04-01T00:14:23+5:302018-04-01T00:14:23+5:30
अहेरी तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली येथील अंगणवाडीचे छत सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोसळले.

अंगणवाडीचे छत कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अहेरी तालुकास्थळापासून तीन किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली येथील अंगणवाडीचे छत सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कोसळले. अंगणवाडी बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येंकापल्ली येथील अंगणवाडीचे छत जीर्ण झाले होते. सदर छत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने इमारत निर्लेखित करून नवीन इमारत बांधून देण्याची मागणी पालकांनी केली होती. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. दुसरी इमारत उपलब्ध नसल्याने याच जीर्ण इमारतीत विद्यार्थी बसत होते. शुक्रवारी सायंकाळी या इमारतीचे अचानक छत कोसळले. सुदैवाने छत सायंकाळी कोसळले. यावेळी विद्यार्थी नसल्याने जीवितहानी झाली नाही. आता तरी जिल्हा परिषदेने निधी मंजूर करून नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी होत आहे.