रोहित बोथरा मारहाण प्रकरणाचे जिल्ह्यात पडसाद
By Admin | Updated: September 5, 2015 01:21 IST2015-09-05T01:21:32+5:302015-09-05T01:21:32+5:30
चंद्रपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी रोहित रमेश बोथरा यांना ३१ आॅगस्ट रोजी चंद्रपूर पोलिसांनी अमानुष मारहाण केली.

रोहित बोथरा मारहाण प्रकरणाचे जिल्ह्यात पडसाद
व्यापारी असोसिएशन : पोलिसांच्या निषेधाचा ठराव पारित
गडचिरोली : चंद्रपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी रोहित रमेश बोथरा यांना ३१ आॅगस्ट रोजी चंद्रपूर पोलिसांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांनी कोणत्याही प्रकारे चौकशी न करता रोहितला दिलेली वागणूक निंदनिय असून अशा घटना वारंवार होऊ नये याकरिता संघटीत होऊन या घटनेचा शुक्रवारी इंदिरा गांधी चौकात निषेध करण्यात आला. व निषेधाचा ठराव दि गडचिरोली मर्चटस् असोसिएशनच्या एका बैठकीत पारित करण्यात आला.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रवी चन्नावार, उपाध्यक्ष गुरूदेव हरडे, सहसचिव फरिद नाथानी, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर, सुभाष असावा, उल्हास राठी, विशाल हलवदीया, हेमंत राठी, राजेश बोमनवार, अमित नंदा, प्रफुल आंबटकर, सुनिल हर्षे, अनिल करपे, प्रभाकर वासेकर, दया चौधरी, कासमभाई धनानी, बबलू बरच्छा, अनिल देशपांडे, सुनिल बावणे, मुन्नाभाई लालानी, दिनू कडीवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)