मार्गाचे रुंदीकरण खांब मात्र रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:58+5:302021-08-27T04:39:58+5:30
सद्य:स्थितीत हुतात्मा स्मारक ते बांधकाम विभागाचे विश्रामगृह व लाखांदुर टी पाॅईंट ते जेजाणी राईस मिल, लाखांदुर ...

मार्गाचे रुंदीकरण खांब मात्र रस्त्यावरच
सद्य:स्थितीत हुतात्मा स्मारक ते बांधकाम विभागाचे विश्रामगृह व लाखांदुर टी पाॅईंट ते जेजाणी राईस मिल, लाखांदुर ते ब्रम्हपुरी मार्ग या रस्त्यावरचे अनेक पोल रस्ता रुंदीकरणामुळे दीड ते दोन मीटर रस्त्यावरच आहेत. त्यामुळे हा मार्ग रुंदीने मोठा असला तरी विद्युत खांबामुळे हा रस्ता वाहनांच्या आवागमनासाठी निरुपयोगाचा ठरत आहे. तसेच विद्युत पोल रस्त्यावरच आल्याने अतिक्रमणधारकांना ही एवढी जागा वापरावयास मिळत आहे. बहुतेक ट्रान्सपोर्ट वाहने या पोलच्या मधोमधील भागात पार्किंग करून ठेवल्या जातात. त्यामुळे रस्ता हयात असूनही ताे वापरता येत नाही. त्यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. सार्वजनिक हिताचा विचार करून ही विद्युत खांब ताबडतोब बाजुला करावेत व पोलमुळे होणारे अपघात तसेच हा पोलमुळे अडलेली जागा वाहतुकीसाठी मोकळी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
निवेदनांना केराची टाेपली
काेट्यवधी रुपये खर्चून मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. मात्र जुने खांब काढले नाहीत. त्यामुळे रत्याचे रुंदीकरण हाेऊनही काहीच फायदा झाला नाही. खांब हटवावे यासाठी अनेकवेळा पाठपुरवा करण्यात आला, मात्र हे खांब हटविण्यात आले नाही.
260821\img_20201229_071728.jpg
राज्यमहामार्गावर वाहतुकीस अडसर...विद्युतपोल.