रस्ता सुरक्षा अभियान सुरू
By Admin | Updated: January 10, 2016 01:47 IST2016-01-10T01:47:57+5:302016-01-10T01:47:57+5:30
वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने...

रस्ता सुरक्षा अभियान सुरू
१० ते २४ पर्यंत पंधरवडा : वाहतूक शाखा व परिवहन विभागाचा पुढाकार
गडचिरोली : वाहतूक नियम व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याकरिता वाहतूक नियंत्रण शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने रविवारपासून २७ वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू होत आहे. या सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम विभागाच्या वतीने राबविले जाणार आहेत.
गडचिरोली वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानात वाहतुकीच्या नियमांचे बॅनर्स, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणारे अपघात याबाबत जनजागृती करण्यासाठी बॅनर्स, वाहतुकीच्या नियमांचे व चिन्ह दर्शविणारे पत्रक इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनात वाटप केले जाणार आहेत. ११ जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कलापथकाद्वारे कार्यक्रम व गडचिरोली शहरात रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. इंदिरा गांधी चौकात हेल्मेट व सीटबेल्टच्या वापराबाबत जनजागृती, मार्गदर्शन, वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत वाहनचालकांच्या डोळ्यांची तपासणी, स्पीडगनच्या सहाय्याने भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची तपासणी मोहीम, बैलबंडी तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, अवैध प्रवासी वाहतूकबाबत विशेष मोहीम, काळीपिवळी व आॅटो तसेच इतर वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम, शाळकरी मुलांना वाहतूक चिन्ह व हातवारे सिग्नलचे प्रात्यक्षिक करून दाखविले जाणार आहे. त्याचबरोबर चित्रकला, निबंध स्पर्धा, खासगी वाहन चालक- मालक संघटनेची बैठक, अवैध प्रवासी वाहतुकीबाबत चर्चा, रस्ता सुरक्षा पंधरवड्याचा समारोप २१ जानेवारीला चित्रकला व निबंध स्पर्धेतील गुणवंतांना बक्षीस वितरणाने होणार आहे, अशी माहिती प्रभारी अधिकारी अमृता राजपुत यांनी दिली आहे.
अपघातग्रस्तांची तज्ज्ञांकडून चिकित्सा
तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अपघातग्रस्तांनी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन, वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे शाळा महाविद्यालयात वाहतूक नियमांसंबंधी व्याख्यान व कार्यक्रम घेतले जाणार आहेत.