श्रमदानातून रस्त्याची दुरूस्ती
By Admin | Updated: August 30, 2015 01:10 IST2015-08-30T01:10:04+5:302015-08-30T01:10:04+5:30
राजाराम खांदला-चिरेपली मार्गावरील पुलाच्यास बाजुची माती वाहून गेल्याने वाहतूक अडथळा निर्माण होत होता.

श्रमदानातून रस्त्याची दुरूस्ती
पोलिसांचा पुढाकार : चिरेपल्ली नाल्यावरील खड्डा बुजविला
राजाराम : राजाराम खांदला-चिरेपली मार्गावरील पुलाच्यास बाजुची माती वाहून गेल्याने वाहतूक अडथळा निर्माण होत होता. मात्र पोलीस विभागाच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी श्रमदानातून रस्त्याची दुरूस्ती केली आहे.
राजाराम खांदला ते चिरपेलीपर्यंतचा मार्ग पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत माती व मुरूम टाकून बांधण्यात आला. मात्र या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. चिरेपली, कोत्तागुडम या परिसरातील नागरिकांना तालुकास्थळी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो.
पावसामुळे या मार्गावरील नाल्याजवळील माती वाहून गेली. त्यामुळे मोठा खड्डा पडला होता. परिणामी दुचाकी व चारचाकी वाहने जाण्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. पोलीस विभागाने सदर खड्डा बुजविण्यासाठी पुढाकार घेत वाहने उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांनीही अंगमेहनत करून खड्डा बुजविला. यासाठी राजारामचे पोलीस निरिक्षक एम. सिरसाठ, पोलीस उपनिरिक्षक कदम यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)