रस्त्यावरील खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी

By Admin | Updated: September 6, 2014 23:46 IST2014-09-06T23:46:15+5:302014-09-06T23:46:15+5:30

गडचिरोली जिल्ह्यात रस्ते विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रूपयाचा निधी येत असला तरी ग्रामीण भागातील जिल्हा व राज्य महामार्गांची दूरावस्था अतिशय वाईट झाली आहे.

Road potholes can be a headache for the citizens | रस्त्यावरील खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी

रस्त्यावरील खड्डे नागरिकांसाठी डोकेदुखी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रस्ते विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रूपयाचा निधी येत असला तरी ग्रामीण भागातील जिल्हा व राज्य महामार्गांची दूरावस्था अतिशय वाईट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे रस्ते दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोरचीसाख्या दुर्गम तालुक्यातील रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. आरमोरी तालुक्यात शिवणी बुज गावाकडे जाणारा रस्ताही पूर्णत: उखडून गेला आहे. कोरची तालुका मुख्यालयापासून १ किमी अंतरावर कोचीनारा ते कोरची या रस्त्यावर पुलाजवळ खड्डे पडले असून या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी सायकलने दररोज ये-जा करतात. तसचे कोरची ते बोटेकसा व कोरची ते बेतकाठी हा रस्ताही उखडून गेला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप या भागातील जिल्हा परिषद सदस्य सुनंदा आतला यांनी केला आहे. तसेच आरमोरी ते शिवणी बुज या रस्त्यालाही जागोजागी मोठे खड्डे पडले असून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे.

Web Title: Road potholes can be a headache for the citizens