पुरामुळे रस्ता पूर्णत: उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:34 IST2017-07-22T00:34:29+5:302017-07-22T00:34:29+5:30
भामरागड तालुक्यातील लाहेरीनजीकचा रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णत: उखडला आहे.

पुरामुळे रस्ता पूर्णत: उखडला
साबांविचा कानाडोळा : लाहेरीवासीयांसमोर आवागमनाचा प्रश्न
लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरीनजीकचा रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावरील गिट्टी व मुरूम वाहून गेला आहे. त्यामुळे आता लाहेरीवासीयांसमोर आवागमनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाहेरीनजीकच्या मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून येथूून दुचाकीही व्यवस्थीत जावू शकत नाही. यापूर्वी अनेकदा लाहेरीवासीयांनी श्रमदानातून या रस्त्याची दुरूस्ती केली होती. मात्र पावसाने सदर रस्ता पुन्हा उखडला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर रस्त्याची पक्की दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानंतर पाठपुरावाही करण्यात आला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची पक्की दुरूस्ती केली नाही. आणखी लाहेरी भागात जोरदार पाऊस झाल्यास या मार्गाची अवस्था बकाल होणार आहे.