नक्षल सप्ताहामुळे मार्ग बंद
By Admin | Updated: December 3, 2015 01:42 IST2015-12-03T01:42:01+5:302015-12-03T01:42:01+5:30
माओवादी संघटनांतर्फे २ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताह साजरा केला जात आहे. यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

नक्षल सप्ताहामुळे मार्ग बंद
गडचिरोली : माओवादी संघटनांतर्फे २ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताह साजरा केला जात आहे. यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. एटापल्ली-जारावंडी हा मार्ग बंद असून एटापल्ली-गट्टा मार्गावरही चारचाकी वाहनांची वाहतूक रोडावलेली होती. कसनसूर मार्गावर नक्षली बॅनर व पत्रके आढळून आले. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव भागातही नक्षल बंदचा प्रभाव दिसून आला. या परिसरात अनेक ठिकाणी बॅनर व पत्रके नक्षलवाद्यांकडून टाकण्यात आली होती. मुरूमगाव येथील व्यापारी प्रतिष्ठान बुधवारी दिवसभर बंद होती. नक्षल बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळ व खासगी बससेवाही प्रभावीत झाली होती. दुपारी ३ नंतर मुरूमगाव भागातून काही प्रमाणात वाहतूक सुरू झाली. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नवजीवन अभियानाला प्रारंभ करून चोख उत्तर दिले आहे.