गडचिरोलीत मजुरांच्या बसला अपघात; एक ठार
By Admin | Updated: May 14, 2017 04:44 IST2017-05-14T04:44:28+5:302017-05-14T04:44:28+5:30
तेलंगण राज्यात तेंदूपत्ता संकलनासाठी जात असलेल्या मजुरांची खासगी बस अहेरी तालुक्यातील उमानूर घाटावर उलटल्याने एक मजूर ठार तर अन्य १० जखमी झाले.

गडचिरोलीत मजुरांच्या बसला अपघात; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली) : तेलंगण राज्यात तेंदूपत्ता संकलनासाठी जात असलेल्या मजुरांची खासगी बस अहेरी तालुक्यातील उमानूर घाटावर उलटल्याने एक मजूर ठार तर अन्य १० जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला.
सुखराम उईके असे मृताचे नाव आहे. जखमींवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, रमेश कराडे या मजुराची प्रकृती बिघडल्याने त्याला गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले.