गोसेखुर्दच्या पाण्याने नद्या फुगल्या
By Admin | Updated: August 4, 2016 01:29 IST2016-08-04T01:29:08+5:302016-08-04T01:29:08+5:30
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्या गेल्याने जवळजवळ ३ हजार ६३ क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे.

गोसेखुर्दच्या पाण्याने नद्या फुगल्या
११.३ मिमी पावसाची नोंद : आतापर्यंत ६६ टक्के पाऊस
गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्या गेल्याने जवळजवळ ३ हजार ६३ क्युमेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक नद्या फुगल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला असून ग्रामीण भागात शेतीकामाला वेग आला आहे. मंगळवारच्या मध्यरात्री १२ वाजतापासून भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक पूर परिस्थितीमुळे ठप्प झाली होती. पर्लकोटा नदीच्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद होता. बुधवारी दुपारी १२ वाजतानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. जिल्ह्यात ३ आॅगस्टला ११.३ मिमी पाऊस झाला आहे. गडचिरोली येथे ८.२ मिमी, कुरखेडा ८.७, आरमोरी १४.६, चामोर्शी १.१, सिरोंचा २५.२, अहेरी १५.८, एटापल्ली १०.९, धानोरा १०.३, कोरची १९.६, देसाईगंज ४.५, मुलचेरा ४.२, भामरागड ५ मिमी पाऊस झाला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८९५.७ मिमी पाऊस झाला. ६६.१ टक्के पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख क्रिष्णा रेड्डी यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)