ऋषीपंचमीला मार्र्कं डानगरी फुलली
By Admin | Updated: September 7, 2016 02:11 IST2016-09-07T02:11:01+5:302016-09-07T02:11:01+5:30
तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी पूजाअर्चा

ऋषीपंचमीला मार्र्कं डानगरी फुलली
उत्तरवाहिणी वैनगंगेत पवित्र स्नान : महिला भाविकांची उसळली गर्दी
चामोर्शी : तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी पूजाअर्चा व पवित्र स्नान करण्यासाठी महिला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे मार्र्कंडा येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मार्र्कंडादेव येथे उत्तरवाहिनी झालेल्या वैनगंगा नदीच्या तिरावर स्नान व पूजाअर्चा करण्यासाठी महिला भाविकांची रिघ लागली होती.
महाशिवरात्री, श्रावणमास व वर्षभर होणाऱ्या विविध धार्मिक उत्सवादरम्यान भाविकांची मार्र्कंडादेव येथे मोठी गर्दी राहते. ऋषी पंचमीनिमित्त भाविकांचे लोंढे मार्र्कंडानगरीत अगोदरच्या दिवसापासूनच दाखल होतात. मार्र्कंडादेव मंदिरा लागून असलेल्या उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तिरावर पूजाअर्चा केली जाते. ऋषी पंचमीनिमित्त महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.
ऋषी पंचमीनिमित्त सप्तऋषीची उपासना केली जाते व उपवास पकडला जातो, असे सात वर्ष केल्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. यासाठी महिला भक्त मोठ्या प्रमाणात मार्र्कंडेश्वराच्या मंदिरात दाखल होतात, अशी माहिती पूजारी अरूण महाराज गायकवाड, रूपेश महाराज गायकवाड, रामू महाराज गायकवाड यांनी दिली.
ऋषी पंचमीनिमित्त मार्र्कंडादेव नगरीला यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले होते. भाविकांच्या व्यवस्थेसाठी मार्र्कंडादेवस्थान ट्रस्टच्या वतीने सोयीसुविधांची पूर्तता करण्यात आली. चामोर्शी पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, गोपाल ढोले, निशा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात नदीतीरावर व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. (शहर प्रतिनिधी)
दुसऱ्या जिल्ह्यातील भाविकांचाही होता सहभाग
ऋषी पंचमीनिमित्त मार्र्कंडेश्वराच्या मंदिरात दरवर्षी जनसागर उसळतो. यावर्षी नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातीलही अनेक भाविक मार्र्कंडा येथे पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. दरवर्षी मार्र्कं डा येथे ऋषी पंचमीनिमित्त भाविकांची गर्दी वाढतच चालली आहे. वाढलेल्या गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.