तांदूळ भरलेला ट्रक गडचिरोलीतून पळविला

By Admin | Updated: July 17, 2014 00:05 IST2014-07-17T00:05:51+5:302014-07-17T00:05:51+5:30

२१ टन तांदूळ भरलेला ट्रक येथील आरमोरी मार्गावरील शिवाणी पेट्रोल पंपासमोरून अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

The rice-laden truck escaped from Gadchiroli | तांदूळ भरलेला ट्रक गडचिरोलीतून पळविला

तांदूळ भरलेला ट्रक गडचिरोलीतून पळविला

गडचिरोली : २१ टन तांदूळ भरलेला ट्रक येथील आरमोरी मार्गावरील शिवाणी पेट्रोल पंपासमोरून अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार धानोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्यासाठी एमएच ३४ एम ७९३० क्रमांकाच्या ट्रकने धानोराकडे नेण्यात येत होता. सदर ट्रक हा देसाईगंज येथील गोदामातून सायंकाळच्या सुमारास गडचिरोलीकडे निघाला. मात्र दमदार पावसामुळे धानोराकडील मार्ग बंद असल्याने ट्रक चालक सुनील साहू यांनी सदर ट्रक आरमोरी मार्गावरील शिवाणी पेट्रोलपंपासमोर उभा केला. रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरात असलेल्या घराकडे जाऊन येतो, असे सांगून ट्रकचालक ट्रक उभा करून निघून गेला. दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर ट्रक चामोर्शीकडे वळविला. लागलीच या घटनेची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी ट्रक पकडण्याचा प्रयत्न केला असता, बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सदर ट्रक चामोर्शी मार्गावरील आष्टी, सोनापूरजवळ सापडला. या ट्रकमध्ये ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचा २१ टन तांदूळ भरलेला होता. मात्र ट्रक सापडल्यानंतर या ट्रकमध्ये केवळ ३ पोते तांदूळ पोलिसांना आढळले. सदर ट्रक गडचिरोली येथील राजेश बोमनवार यांच्या मालकीचा आहे.

Web Title: The rice-laden truck escaped from Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.