एसडीओंकडून तलाठ्यांच्या कामाचा आढावा

By Admin | Updated: May 28, 2015 00:57 IST2015-05-28T00:57:54+5:302015-05-28T00:57:54+5:30

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली.

Review of the work of the SDO from the SDO | एसडीओंकडून तलाठ्यांच्या कामाचा आढावा

एसडीओंकडून तलाठ्यांच्या कामाचा आढावा

अहेरी : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत तलाठ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
महसूल विभागातील तलाठ्याचे पद सर्वात कनिष्ठ दर्जाचे असले तरी गावपातळीवर शासनाच्या योजना राबविण्यात तलाठी अत्यंत मोलाची भूमिका बजाविते. उपविभागातील तलाठ्यांनी नेमके किती प्रमाणात व कोणते काम केले, याबाबतचा आढावा घेण्यासाठी सभा आयोजित केली. या सभेला अहेरीचे तहसीलदार एस. आर. पुप्पलवार, नायब तहसीलदार वनिता नेरलवार, किरमे, अहेरी तालुक्यातील सर्व मंडळ निरीक्षक उपस्थित होते. सभेदरम्यान तलाठ्यांनी केलेल्या कामावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर पुढील कामांचे नियोजन करण्यात आले. काही तलाठ्यांना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी मार्गदर्शन करून कामात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. सूचनांचे पालन न करणाऱ्या तलाठ्यांसोबतच मंडळ निरीक्षकांवरही कारवाई करण्याचा इशारा एसडीओ पाटील यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Review of the work of the SDO from the SDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.