शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

आयुक्तांनी घेतला विकासकामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:24 IST

जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मात्र प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांचा तसेच विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी घेतला.

ठळक मुद्देआरोग्यावर भर देण्याची सूचना : जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आकांक्षित जिल्ह्यातील कामांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मात्र प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रलंबित प्रकल्पांचा तसेच विविध योजनांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी घेतला.आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपायुक्त सुधाकर तेलंग, एन. के. राव, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अप्पर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करताना डॉ. संजीवकुमार म्हणाले, सुदृढ बालकांसाठी गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अमृत आहार योजनेच्या माध्यमातून सकस आहार, औषधोपचार देऊन मातेचे आरोग्य उत्तम राहिल, याची दक्षता घ्यावी. कोणतीही गरोदर माता अमृत आहार योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश दिले.सभेच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्याचा निर्देशांक वाढविण्यासाठी आणि त्याला पुढे नेण्यासाठी डायलॉग गडचिरोली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव संकल्पनेत युनिसेफच्या तज्ञांकडून मार्गदर्शन झाले आहे. सुदृढ आरोग्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करून सेवा देण्याचे काम सुरू आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोषण, कृषी, सलग्न सेवा, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक समावेशन, पायाभूत संरचना या घटकावर आधारीत २९ निर्देशांक ठरवून देण्यात आले आहेत. प्रत्येक निर्देशांकावर विकासाचे काम चालू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.बैठकीत महसूल विभागाशी संबंधित मुद्यांवर चर्चा झाली. बँक प्रणालीमध्ये डाटाएन्ट्रीची प्रगती, महसुली वसुलीची सद्य:स्थिती, कापसावरील बोंडअळी, धानावर मावा-तुडतुडा यामुळे झालेल्या नुकसानीची द्यायची मदत, वनहक्क, पेसा कायद्यांतर्गत केलेल्या कामाची प्रगती, आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.