महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

By Admin | Updated: April 23, 2016 01:24 IST2016-04-23T01:24:07+5:302016-04-23T01:24:07+5:30

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १० एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा ...

Revenue workers strike strike farmers | महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

कामे थांबली : खरीपाच्या तोंडावर अडचण
वैरागड : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी १० एप्रिलपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर हे आंदोलन सुरू झाल्याने मागील दहा-बारा दिवसांपासून तलाठी कार्यालय बंद पडून आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात अडचणी निर्माण झाल्या आहे.
ग्रामीण भागात शेती व्यवस्थेचे सारे दस्तावेज तलाठी कार्यालयातच उपलब्ध असतात. बरेचशे तलाठी कार्यालय भाड्याच्या इमारतीमध्ये आहेत. या ठिकाणी विद्युत पुरवठाही नाही. त्यामुळे संगणकीय सातबारा देण्यास अडचण होते. लॅपटॉप तलाठ्यांना पुरवठा करण्यात आले. परंतु ते नादुरूस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याकडून हाताने लिहूनच सातबारा घ्यावा लागतो. बरेच वेळा दुर्गम भागात असलेले लॅपटॉप लिंकफेलमुळे चालत नाही. अशा परिस्थितीत तलाठ्याला भेटून या साऱ्या बाबी मार्गी लागतात. परंतु संपामुळे तलाठी कार्यालय बंद असून शासनाने या संपाचा सकारात्मक दृष्टीकोणातून तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Revenue workers strike strike farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.