आरटीओने वसूल केला ७ कोटी १८ लाखांचा महसूल
By Admin | Updated: December 11, 2015 01:56 IST2015-12-11T01:56:55+5:302015-12-11T01:56:55+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीला शासनाकडून २०१५-१६ या वर्षाकरिता १३ कोटी ५७ लाख रूपये महसुलाचे उद्दीष्ट देण्यात आले होते.

आरटीओने वसूल केला ७ कोटी १८ लाखांचा महसूल
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची माहिती : ८५ आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण
गडचिरोली : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीला शासनाकडून २०१५-१६ या वर्षाकरिता १३ कोटी ५७ लाख रूपये महसुलाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत या कार्यालयाने ७ कोटी १८ लाख २२ हजार ८७ रूपये महसूल शासनाला मिळवून दिला आहे. तसेच राज्यभर आॅटोरिक्षा विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपर्यंत ८५ प्रकरण निकाली काढण्यात आले असून यातून शासनाला ६ लाख ४९ हजार ४५८ रूपयांचा महसूल वसुल करून देण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. पी. फासे यांनी दिली आहे.
आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत १२१.२९ लाख रूपयांचा महसूल वसुल केला आहे. यामध्ये तडजोड शुल्क ४७.२८ लाख, विभागीय शुल्क ५६.४६ लाख, चालू कर ५३.२० लाख, जुना थकीत कर ९.६३ लाख रूपये असा एकूण १२१.२९ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)