दुर्गम भागात महसूल प्रशासन; वारस फेरफाराचे 33 अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST2020-12-26T05:00:00+5:302020-12-26T05:00:37+5:30
शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत. वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता.

दुर्गम भागात महसूल प्रशासन; वारस फेरफाराचे 33 अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक शेतकरी व नागरिक अजूनही अज्ञानी आहेत. शेती व कृषीविषयक याेजनांबाबत या भागात फारशी जनजागृती नाही. परिणामी ही अडचण लक्षात घेऊन महसूल विभागाच्या पुढाकाराने तालुक्याच्या अतिदुर्गम हिदूर व विसामुंडी गावात फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात वारस फेरफाराचे ३३ अर्ज दाखल करण्यात आले.
शिबिराला प्रामुख्याने मंडळ अधिकारी भाऊसाहेब गड्डम, विसामुंडीचे तलाठी पाटील, हिदूरचे तलाठी राहुल मडावी आदी उपस्थित हाेते. तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर अजूनही वारसासंबंधी फेरफार करण्यात आले नाही. मय्यत झालेल्या अनेक नागरिकांची नावे सातबारावर कायम आहेत. वारस फेरफार न केल्यामुळे सातबारा अद्यावत नाही. ही बाब महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दुर्गम भागात यासंबंधी शिबिर घेण्याचा मानस महसूल विभागाने व्यक्त केला हाेता. मात्र काेराेना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे हे शिबिर लांबणीवर पडले. काेराेना संदर्भात शासनाने अनलाॅक केल्यानंतर डिसेंबर महिन्यात शिबिर घेण्याचे निश्चित झाले. २१ डिसेंबर राेजी विसामुंडी व हिदूर येथे वारस फेरफार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात प्रथम चावडी वाचन करण्यात आले. त्यानंतर मय्यत व्यक्तीविषयी चाैकशी करण्यात आली. वारस फेरफार घेण्यासाठी मय्यत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही, त्यांच्यासाठी चाैकशी पंजी व ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला. हिदूर येथे १५ तर विसामुंडी येथील शिबिरात १८ असे एकूण ३३ अर्ज वारस फेरफारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्व अर्ज लवकर निकाली काढण्यात येतील, असे मंडळ अधिकारी गड्डम यांनी नागरिकांना सांगितले.
प्रशासन नागरिकांच्या दारी
भामरागडसारख्या दुर्गम भागात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाेहाेचत नाही. पाेहाेचले तरी धावती भेट देऊन परत येतात. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तशाच कायम राहतात. मात्र महसूल विभागाच्या पुढाकाराने वारस शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट गावात व नागरिकांच्या दारी आल्याचे स्थानिकांना दिसून आले. या उपक्रमाचा लाेकांनी काैतुक केले.