११ कोटी ६ लाखांचा महसूल
By Admin | Updated: May 9, 2015 01:43 IST2015-05-09T01:43:11+5:302015-05-09T01:43:11+5:30
स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात ओव्हरलोड वाहतूक, ...

११ कोटी ६ लाखांचा महसूल
गडचिरोली : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाने १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात ओव्हरलोड वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र तसेच परवाना नूतनीकरणासंदर्भात कारवाई करून एकूण ११ कोटी ६ लाख ५३ हजार रूपयांचा महसूल प्राप्त केला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
उप्रपादेशिक परिवहन कार्यालयाला शासनाकडून कर, दंडाबाबत २०१४-१५ या आर्थिक वर्षात एकूण नऊ कोटी ६९ लाख रूपयांच्या महसूलाचे उद्दीष्ट दिले होते. गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सदर उद्दीष्ट पूर्ण केल्याचे दिसून येते.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायू वेग पथक वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात वाहने अडवून कारवाई करीत असते. वायूवेग पथकाने २०१४-१५ या वर्षात विनापरवाना, वाहनांची कागदपत्रे नसणाऱ्या वाहनांना अडवून संबंधित वाहनचालकांकडून एकूण ५६ लाख ९७ हजारांचा दंड वसूल केला. यामध्ये २०१४ च्या एप्रिल महिन्यात चार लाख दोन हजार, मे महिन्यात पाच लाख दोन हजार, जून महिन्यात पाच लाख २० हजार, जुलै महिन्यात दोन लाख ५९ हजार, आगस्ट महिन्यात चार लाख २७ हजार, सप्टेंबर महिन्यात पाच लाख पाच, आॅक्टोबर महिन्यात चार लाख ९० हजार, नोव्हेंबर महिन्यात पाच लाख २१ हजार व डिसेंबर महिन्यात पाच लाख ५९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. २०१५ च्या जानेवारी महिन्यात पाच लाख ४१ हजार, फेब्रुवारी महिन्यात चार लाख १० हजार व मार्च महिन्यात पाच लाख ६१ हजार रूपयांचा दंड केला असल्याची माहिती मिळाली आहे.
खरेदी केलेल्या एक वर्षाच्या आतील वाहनांच्या चालकांवर कर न भरल्यामुळे वायूवेग पथकाने कर वसुलीची कारवाई केली. २०१४-१५ या वर्षात एक वर्षाच्या आतील कर न भरलेल्या वाहनधारकांकडून १०६ लाख ९७ हजारांचा कर वसूल केला.
वर्षभरापेक्षा अधिक कालावधी झालेल्या जुन्या वाहनांच्या मालकांकडून वर्षभरात एकूण १९ लाख ३१ हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. उप प्रादेशिक कार्यालयाने शासनाने दिलेले महसुली उत्पन्नाचे उद्दीष्ट पूर्ण केले. (स्थानिक प्रतिनिधी)