सापडलेले १० हजार केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:40 IST2016-01-10T01:40:21+5:302016-01-10T01:40:21+5:30
येथील तीन युवकांना १० हजार रूपये असलेली पर्स मिळाली. मात्र या युवकांनी महिलेचा शोध घेऊन ते १० हजार रूपये व पर्स परत करीत ...

सापडलेले १० हजार केले परत
देसाईगंज येथील घटना : प्रामाणिकपणाचा दिला परिचय
देसाईगंज : येथील तीन युवकांना १० हजार रूपये असलेली पर्स मिळाली. मात्र या युवकांनी महिलेचा शोध घेऊन ते १० हजार रूपये व पर्स परत करीत आजही प्रामाणिकपणा काही नागरिकांमध्ये जीवंत आहे. याचा परिचय करून दिला.
किदवाही वार्डातील नागरिक रहेमान खान ताज खान पठाण यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना देसाईगंज येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल होते. रहेमान खान यांच्या उपचारासाठी पैसे घेऊन त्यांची पत्नी सऐमा पठाण दवाखान्यामध्ये जात होती. दरम्यान पैशाने भरेली पर्स रस्त्यात पडली. सदर पर्स देसाईगंज येथीलच अनिल दहकानी, अजय दासवानी व त्यांचा साथीदार कन्हैय्या यांना मिळाली. पर्समधील दस्तावेजांच्या आधारावर रहेमान खान यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर तिन्ही युवकांनी रूग्णालयांत जाऊन रहेमान खान यांच्याकडे पर्स परत केला. (शहर प्रतिनिधी)