नवाेपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:20+5:302021-01-10T04:28:20+5:30
शिक्षकांच्या सर्जनशीलतेला वाव देऊन एखाद्या शिक्षकाने राबविलेला उपक्रम राज्यभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरावा यासाठी राज्यभरात नवाेपक्रम स्पर्धा राबविली जाते. यावर्षी ...

नवाेपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर
शिक्षकांच्या सर्जनशीलतेला वाव देऊन एखाद्या शिक्षकाने राबविलेला उपक्रम राज्यभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरावा यासाठी राज्यभरात नवाेपक्रम स्पर्धा राबविली जाते. यावर्षी काेराेनाच्या संकटातही ही स्पर्धा घेण्यात आली. शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यानंतर त्यांची मुलाखत घेण्यात आली. जिल्हाभरातून या स्पर्धेसाठी माेठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले हाेते. मुलाखतीअंती निकाल जाहीर करण्यात आले आहेत. प्राथमिक गटातून धानाेरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देवेंद्र लांजेवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर चामाेर्शी तालुक्यातील नवेगाव रै. शाळेचे शिक्षक आशिष येल्लेवार यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक सचिन खेडकर, द्वितीय क्रमांक गाेमणी येथील आनंदराव अलाेने यांनी पटकाविला आहे. या सर्व शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.