श्रमदानातून पूल दुरूस्ती

By Admin | Updated: July 12, 2015 02:00 IST2015-07-12T02:00:02+5:302015-07-12T02:00:02+5:30

रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली.

Restoration of labor pool | श्रमदानातून पूल दुरूस्ती

श्रमदानातून पूल दुरूस्ती

प्रशासनाचे दुर्लक्ष : कोठी, नारगुंडा गावातील नागरिक व पोलिसांचे सहकार्य
भामरागड : रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली.
कोठी हे गाव भामरागड तालुकास्थळापासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे. कोठीच्या पलिकडेही अनेक गावे आहेत. कोठी येथे आश्रमशाळा असल्याने सभोवतालच्या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दरदिवशी ये-जा करतात. त्याचबरोबर कोठी हे परिसरातील मोठे गाव असल्याने इतर कामासाठीही नागरिक कोठी येथे येतात. भामरागड या तालुकास्थळावरही कोठी परिसरातील अनेक नागरिक जातात. कोठी गावाजवळ नाला असून या नाल्यावर कमी उंचीचा व रुंदीचा पूल आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरून तसेच पुलाच्या दोन्ही बाजुने पाणी वाहते. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजुची माती वाहून जाते. त्यामुळे पूल व रस्ता यांच्यामध्ये भलामोठा खड्डा पडते.
उन्हाळ्यामध्येच कोठी येथील गावकरी व कोठी पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी पुलाच्या बाजुला माती टाकून रस्ता सुरळीत केला होता. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर माती वाहून गेली. त्यामुळे त्याच जागेवर आणखी मोठा खड्डा पडला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही खड्डा बुजविण्यास तयार नसल्याने नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी श्रमदानातून खड्डा बुजविला व मार्ग सुरळीत केला. पाणी आल्यानंतर त्यावरील माती वाहून जाणे ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास तयार नाही. पुलावरून पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतुकही अनेक दिवस खोळंबते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
नारगुंडा नाल्यावरील बायपास मार्गावर टाकली माती
नारगुंडा नाल्यावरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर पूल अजूनही पूर्ण झाला नाही. वाहनांना जाण्यासाठी बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात बायपास मार्ग पाण्यामुळे वाहून गेला. रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नारगुंडा येथील नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून सदर बायपास मार्ग दुरूस्त केला. पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत असली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Restoration of labor pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.