वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सर्वांची
By Admin | Updated: July 3, 2017 01:15 IST2017-07-03T01:15:14+5:302017-07-03T01:15:14+5:30
शासनाने प्रदूषण व दुष्काळ निवारणाच्या उद्देशाने १ जुलै रोजी कृषी दिवस आणि वनमहोत्सवाचे औचित्य साधून चार कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले.

वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सर्वांची
देवराव होळी यांचे प्रतिपादन : गडचिरोली पालिकेतर्फे कार्यक्रम
ंलोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाने प्रदूषण व दुष्काळ निवारणाच्या उद्देशाने १ जुलै रोजी कृषी दिवस आणि वनमहोत्सवाचे औचित्य साधून चार कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन केले. त्या अनुषंगाने भविष्यातील सुख समृध्दीचा विचार करुन जिल्ह्यातील समस्त जनतेने तसेच शासकीय कार्यालयांनी सुध्दा आपल्या कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करुन या जनहित योजनेला प्रचंड प्रतिसाद द्यावा आणि वृक्ष लागवडीनंतर संवर्धनाची जबाबदारी सर्वांनी स्विकारावी असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
शनिवारी स्थानिक नगरपरिषद कार्यालयातून वृक्षदिंडी शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आली. चंद्रपूर मार्गावरील नगर भवनात दिंडीचे समारोप होवून नगरभवनाच्या परिसरात डॉ. होळी यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, न.प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापी आनंद शृंगारपवार, मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, नगराध्यक्षा योगिता पिपरे यांचेही यावेळी समयोचित भाषण झाले. उपवनसंरक्षक शिवाजी फाले यांनी वृक्ष लागवड संदर्भात नियोजनात्मक माहिती देतांना म्हणाले की, गडचिरोली जिल्हयातंर्गत २०१७ या वर्षात विविध विभागांचा समावेश करुन १७ लाख १२ हजार रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात वनविभागाव्दारे १० लाख ५१ हजार, सामाजिक वनीकरण विभागामार्फत ४१ हजार ५००, वनविकास महामंडळामार्फत ३ लाख ६० हजार, ग्रामपंचायत व इतर यंत्रणेमार्फत २ लाख ५९ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट आहे. अशा विविध यंत्रणामार्फतीने एकूण २६ लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती फुले यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाला नगर पालिकेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोळ, शिक्षण सभापती नितीन उंदीरवाडे, नियोजन सभापती गुलाब मडावी, महिला व बाल कल्याण सभापती अल्का पोहणकर, उपसभापती वैष्णवी नैताम, नगरसेवक नंदू काबरा, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, भूपेश कुळमेथे, मुक्तेश्वर काटवे, सतीश विधाते, प्रवीण वाघरे, प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे, रंजना गेडाम, मंजूषा आखाडे, निमा उंदीरवाडे रितू कोलते, पूजा बोबाटे आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.