कर्मचाºयांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:31 IST2017-08-26T23:30:43+5:302017-08-26T23:31:31+5:30
जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कर्मचाºयांच्या समस्या सोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या, अशी मागणी कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आरोग्य कर्मचाºयांच्या समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आरोग्य कर्मचाºयांच्या समस्या निकाली काढल्या जातील, असे आश्वासन डॉ. शंभरकर यांनी शिष्टमंडळाला दिली. याप्रसंगी कॉस्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, जि. प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिगांबर डोर्लीकर, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रायसिंग राठोड, शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गंगाधर मडावी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रामटेके, सचिव पी. के. गेडाम, टेंभुर्णे व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.