बीएएमएस डॉक्टरांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 23:43 IST2017-10-08T23:42:45+5:302017-10-08T23:43:10+5:30
आरोग्य योजनेंतर्गत एनसीआयएसएमबी २०१७ केंद्र शासनाच्या वतीने नवीन बिल काढण्यात येत आहे. सदर बिल रद्द करावा, अन्यथा त्यात सुधारणा करावी, ....

बीएएमएस डॉक्टरांच्या समस्या सोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : आरोग्य योजनेंतर्गत एनसीआयएसएमबी २०१७ केंद्र शासनाच्या वतीने नवीन बिल काढण्यात येत आहे. सदर बिल रद्द करावा, अन्यथा त्यात सुधारणा करावी, अशी मागणी तालुक्यातील बीएएमएस डॉक्टरांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
देसाईगंज तालुक्यातील बीएएमएस डॉक्टरांनी ६ आॅक्टोबर २०१७ ला रूग्णालय बंद ठेवून सदर बिलाचा निषेध नोंदविला होता. ग्रामीण भागात बीएएमएस डॉक्टर कठिण परिस्थितीत सेवा देत आहेत. याशिवाय शासनाच्या ग्रामीण आरोग्य अभियान, राष्टÑीय बाल सुरक्षा कार्यक्रम, १०८ रूग्णवाहिका सेवा, फिरते वैद्यकीय पथक आदी उपक्रमांमध्ये बीएएमएस डॉक्टरांचा मोठा सहभाग आहे. या डॉक्टरांच्या सेवेला फटका बसू शकतो. त्यामुळे सदर बिलात सुधारणा करावी, अशी मागणी डॉ. विनोद नाकाडे, डॉ. अनिल नाकाडे, डॉ. कीर्ती नाकाडे, डॉ. चंद्रकांत नाकाडे, डॉ. अमोल बुद्धे, डॉ. गणेश मुंडले, डॉ. मीनाक्षी बन्सोड, डॉ. संतोष खंडेलवाल, डॉ. अजय गायकवाड, डॉ. शिषीर धोटे, डॉ. मनीष भुसारी, डॉ. विद्या नाकाडे, डॉ. किरण बुद्धे, डॉ. हितेश जुमनाकडे, डॉ. नागसेन भोवते यांनी केली आहे.