त्रिसुत्री विकासाचा संकल्प
By Admin | Updated: January 12, 2015 22:50 IST2015-01-12T22:50:53+5:302015-01-12T22:50:53+5:30
रोजगार, शिक्षण व सिंचन या त्रिसुत्रीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वागिण विकासाचा संकल्प केला असून हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अर्थ

त्रिसुत्री विकासाचा संकल्प
गडचिरोली : रोजगार, शिक्षण व सिंचन या त्रिसुत्रीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वागिण विकासाचा संकल्प केला असून हा संकल्प पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रकाश पोरेड्डीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, पूर्व विदर्भ संघठन मंत्री आशिष वांदिले, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, रमेश भुरसे, सुधाकर येनगंधलवार, डेडूजी राऊत, गजानन येनगंधलवार, प्रकाश अर्जुनवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा भाजपा व भाजयुमोच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर गडचिरोली जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासाकडे यापूर्वी होऊन गेलेल्या सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. त्यावेळी विरोधी पक्षात असतांनाही गडचिरोली जिल्ह्याचे प्रश्न विधानसभेत मांडत होतो. गोंडवाना विद्यापीठ निर्मितीचा पहिला अशासकीय ठराव आपण विधानसभेमध्ये मांडला होता. विद्यापीठ निर्माण झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात भर पडली आहे. मार्र्कंडा तीर्थ स्थळाच्या विकासाकरिता निधीची तरतूद व्हावी या हेतूने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केला. त्यामुळे मार्र्कंडा तीर्थस्थळाच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला असून विकास कामे सुरू आहेत.
आयुष्याचा प्रत्येक क्षण जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला असून भाजपा कार्यकर्त्यांचा सन्मान व जतनेचे समाधान हेच आपले ध्येय आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. संचालन डॉ. भारत खटी यांनी केले तर आभार स्वप्नील वरघंटे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)