शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरी आदर्शग्राम बनविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 01:44 IST

पेंढरी गावामध्ये विविध शासकीय योजना अत्यंत प्रभाविपणे राबवून या गावाचा विकास केला जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्शवत ठरावे.

जनजागरण मेळावा : देवराव होळी यांच्या हस्ते शासकीय मदतीचे वाटपधानोरा : पेंढरी गावामध्ये विविध शासकीय योजना अत्यंत प्रभाविपणे राबवून या गावाचा विकास केला जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्शवत ठरावे. या दृष्टीनेही या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. धानोरा तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीच्या वतीने क्रीडा स्पर्धा व जनजागरण मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून एसडीपीओ इंगळे, प्रमोद पिपरे, नंदू काबरा, रमेश भुरसे, गोवर्धन चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेव शेडमाके, जिल्हा परिषद सदस्य शांताबाई परसे, पंचायत समिती सदस्य जास्वंदाबाई करंगामी, प्रा. गलगट, सरपंच सुदर्शन आतला, डॉ. सुरेश चौधरी, लीलाबाई वाणी, करंगामी, दशरथ पुंगाटी, चित्रलेखा रायपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याला पेंढरी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. निराधार नागरिकांना शासनाच्या वतीने मदत दिली जाते. या जनजागरण मेळाव्यादरम्यान मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी सोनवणे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फतीने जाणून घ्यावी, त्याचबरोबर अर्ज तयार करून संबंधित विभागाकडे पाठवावा, असे आवाहन केले. यशस्वीतेसाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)