शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण हा मुसलमान समाजाचा हक्क

By admin | Updated: March 1, 2015 01:45 IST

आघाडी सरकारने मुसलमान समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील मुसलमान समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तथा राजकीय...

देसाईगंज : आघाडी सरकारने मुसलमान समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील मुसलमान समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तथा राजकीय मागासलेपणा दूर करण्याचा प्रयत्न होता. मात्र भाजप-सेना युती सरकारने मुसलमानांच्या आरक्षणावर आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे येथील मुसलमान बांधव आपल्याला अपमानीत मानत आहेत. पाच टक्के आरक्षण हा मुस्लिम बांधवांचा हक्क आहे. तो त्यांना मिळायलाच हवा, असा सूर मान्यवरांनी काढला.देसाईगंज येथील मदिना मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम समाजाच्या वतीने आरक्षण परिषदेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी माजी. जि. प. अध्यक्ष हाजी बशीर पटेल, अ‍ॅड. रफीकभाई, आशिक हुसैन, फिरोज खान, मुश्ताफ कुरेशी, सय्यद आबीदअली, अनवर अली, ताज कुरेशी, कादर कुरेशी, गणी शेख, हक कुरेशी, सत्तार रिझवी, शहजाद शेख उपस्थित होते.मुस्लिम बांधव जोपर्यंत अन्यायाच्या विरोधात एकवटणार नाही, तोपर्यंत या समाजावरील अन्याय दूर होणार नाही, असे प्रतिपादन पटेल यांनी केले. २ मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चा यशस्वी करण्यावरही मंथन करण्यात आले. यशस्वीतेसाठी लतीफ रिझवी, इल्यास खान, वहीद खान, अ. लतीफ शेख, सईद शेख, जावेद कुरेशी, शफीभाई, नसीम, जिब्बू यांनी सहकार्य केले. संचालन नसीर जुम्मन शेख तर आभार सईद शेख यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)