प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनृ
By Admin | Updated: July 10, 2014 23:35 IST2014-07-10T23:35:53+5:302014-07-10T23:35:53+5:30
राज्यातील प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्राथमिक शिक्षकांच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून

प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनृ
चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्राथमिक शिक्षकांच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून राज्य शासनाया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले. त्याचाच भाग म्हणून जिल्हा शाखा चंद्रपूरच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्ग एक ते पाचच्या कनिष्ठ प्रााथमिक शाळांतील प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र शिक्षक मिळावा, वरिष्ठ प्राथमिक शाळेकरीता शिक्षक मिळावा, प्रत्येक प्राथमिक शाळेत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करावी, गणित- विज्ञान विषयाच्या सेमी इंंग्रजी माध्यमाच्या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना मोफत मिळाव्या, ग्रामीण भागात पूर्व प्राथमिक शिक्षण अंगणवाडीतून न देता शाळांना बालवाडी मिळावी, सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना भेदभावरहित मोफत गणवेश योजना लागू करावी, प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीज पुरवठा न करता मोफत वीज मिळावी, शिक्षकांना मतदार नोंदणी कामासह सर्वच अशैक्षणिक कामातून मुक्ती मिळावी, प्राथमिक शाळांत सुरू असलेले वेगवेगळे गुणवत्ता विकास कार्यक्रम बंद करून सर्वसमावेशक एकच कार्यक्रम असावा, शाळा तपासणीच्या भरारी पथकात केवळ शिक्षण विभागाचे अधिकारी असावेत, सर्व केंद्र शाळा व वरिष्ठ प्राथमिक शाळांना इन्टरनेटसह संगणक सुविधा असावी, सर्व शिक्षा अभियानाची सर्व अनुदाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मिळावी, जिल्हा परिषद शाळांना मिळणारे चार टक्के सादील अनुदान मिळावे, संगणक परीक्षा उत्तीर्ण करण्यास मुदतवाढ मिळावी, २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करून नये, उत्कृष्ट तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेतनवाढी मिळाव्यात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची वयोमर्यादा वाढवावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शायांना इयत्ता पाचवी वी व आठवीचे वर्ग जोेडावेत, स्वयं अर्थसहाय्यीत शाळांना परवानगी देवू नये, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी रामदास एकरे, मोरेश्वर गौरकार, सुधाकर पोपटे, विजय वाकडे, सुषमा बाळबुद्धे, शंकर तराळे, राम बोबडे, अशोक वैद्य, भास्कर देरकर, संजय काकडे, रामेश्वर शेंडे, प्रकाश कोयताडे, विनोद शास्त्रकार, दिनेश टिपले, संजय दमके, मनोहर धारणे, महादेव माने, भीमराव पाटील, नरेंद्र इनकने आदींचा समाावेश होता.(प्रतिनिधी)