रिपब्लिकन महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:43+5:302021-03-13T05:06:43+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नीता सहारे तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा बारसागडे, जिल्हा सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, ...

The Republican Women's Front felicitates capable women | रिपब्लिकन महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

रिपब्लिकन महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नीता सहारे तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा बारसागडे, जिल्हा सरचिटणीस ज्योती उंदिरवाडे, सत्कारमूर्ती अ‍ॅड.कविता मोहरकर, मनिषा मडावी, जिल्हा संघटिका डॉ.अंकिता धाकडे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष वनमाला झाडे आदी उपस्थित होत्या. अ‍ॅड.मोहरकर यांनी हा माझ्या जीवनातील सर्वोच्च सत्कार असल्याचे नमूद करून, यामुळे मला नवीन ऊर्जा प्राप्त होईल, असे सांगितले. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनीही उपस्थिती दर्शवून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी हंसराज उंदिरवाडे, अनिल बारसागडे, प्रल्हाद रायपुरे, नरेंद्र रायपुरे, प्रा.प्रतिमा बन्सोड, विभा उमरे, माधुरी शंभरकर, कविता खोब्रागडे, सुमित्रा राऊत, अल्का नैताम, कविता जांभुळकर, यशोधरा जांभुळकर, चंद्रकला टेंभुर्णे, मोना शहा यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The Republican Women's Front felicitates capable women