प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:16+5:302021-02-05T08:51:16+5:30

उपपाेलीस स्टेशन, रेपनपल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. त्यानंतर परिसरातील छल्लेवाडा येथील अनाथ मुलीला उपापाेलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, ...

Republic Day is celebrated everywhere | प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी साजरा

प्रजासत्ताक दिन ठिकठिकाणी साजरा

उपपाेलीस स्टेशन, रेपनपल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाराेहण करण्यात आले. त्यानंतर परिसरातील छल्लेवाडा येथील अनाथ मुलीला उपापाेलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, एसआरपीएफ जालना ग्रुप व सीआरपीएफ ९ बटालियनच्या वतीने गृहोपयाेगी सर्व भांडी, कपडे, तांदूळ आदी साहित्य वितरित करण्यात आले.

जि. प. केंद्र शाळा, भेंडाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राकेश येगलाेपवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. ग्राम पंचायतमधील ध्वजाराेहण पाेलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच वनिता पाेरेड्डीवार, नंदा माेगरे, कुंदा जुवारे, अल्का डांगे, अल्का सातपुते, गुरूदेव डांगे, विठ्ठल सातपुते, निखिल उंदीरवाडे, वर्षा सातपुते, कुसुम उंदीरवाडे, गीत तुंबडे, संजय चलाख, ज्योती नंदेश्वर, किरण मशाखेत्री, विश्वेश्वर सहारे, पूजा खांडेकर, हर्षा सातपुते, ज्योत्सना वैरागडे, चरणदास कोटांगले, तलाठी डी. एस. शेडमाके, मुख्याध्यापक नीलेश खोब्रागडे उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी वंदना गुरनुले, पाैर्णिमा साव यांनी सहकार्य केले.

विश्वशांती विद्यालय, भेंडाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ दुधबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांसह प्रमाणपत्र देण्यात आले. सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अनिल टेप्पलवार यांनी शाळेला दहा हजार रुपये किंमतीच्या पुस्तकांचा संच भेट दिला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक दिलीप डांगे, पर्यवेक्षक मधुकर जाधव, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम चलाख, दादाजी बारसागडे, पांडुरंग जुवारे, अनिल येग्लोपवार, बंडू खोब्रागडे तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय, धानाेरा : प्रजासत्ताक दिनानिमित्त वैद्यकीय अधीक्षक डाॅ. देवेंद्र सावसाकडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. ध्वजाराेहणानंतर तंबाखूमुक्ती व स्त्री भ्रूणहत्याविराेधी शपथ घेण्यात आली. सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानांनी रुग्णालयात मिठाईचे वाटप केले. तसेच लायन्स क्लब नागपूर व समाजसेवा संस्थेच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, उपकमांडंट प्रमाेद सिरसाट, सहायक कमांडंट राेहताश कुमार, गणेश कुळमेथे, नलिनी येल्ले, स्नेहा भजगवळी तसेच कर्मचारी उपस्थित हाेते.

तहसील कार्यालय, काेरची : प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार छगनलाल भंडारी यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित हाेते.

ग्रामपंचायत, आष्टी : प्रजासत्ताक दिनानिमित्त तंमुस अध्यक्ष गणेश निष्ठुरवार यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मणराव बेलसरे, शंकर मारशेट्टीवार, पोलीस पाटील प्रमोद खंडरे, ग्रा. पं. सदस्य दिवाकर कुंदोजवार, आशिष बावणे, वर्षा कलाक्षपवार, ग्रा. पं. चे कर्मचारी उपस्थित होते. येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य संतोष सरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक डी. डी. रॉय यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयातील ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमेंद्र दामोदरे यांच्या हस्ते झाले. जि. प. उच्च प्राथमिक शाळेत शाळा समितीचे अध्यक्ष रमेश बोरकुटे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक किरण झाडे, तंमुस अध्यक्ष गणेश निष्ठुरवार, पोलीस पाटील प्रमोद खंडरे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय, आष्टी : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राचार्य प्रल्हाद मंडल, प्राचार्य संजय फुलझेले यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमाला शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष ताराचंद घ्यार उपस्थित होते. यावेळी संविधान वाचन करण्यात आले. शारीरिक शिक्षक सुशील अवसरमोल यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. यावेळी पर्यवेक्षक श्रीधर चौधरी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रभारी प्राचार्य डाॅ.पंकज चव्हाण यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाले. कार्यक्रमाला डाॅ. गाेपाल ताेमर, डाॅ. रमेश साेनटक्के, डाॅ. अपर्णा मारगाेनवार, डाॅ. एम. पी. सिंग, डाॅ. प्रदीप कश्यप, डाॅ. पी. के. सिंह, डाॅ. दीपक नागापुरे, डाॅ. प्रकाश राठाेड, प्रा. सुबाेध साखरे, प्रा. महेश सिलमवार, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. जया राेकडे, प्रा. कवेंद्र साखरे, प्रा. राहूल आवारी, अरविंद थुटे, रवींद्र झाडे, राकेश बाेगीवार, शुभांगी डाेंगरे, विजय खाेब्रागडे, अविनाश जीवताेडे, देविदास किवे, रमेश वागदरकर, रामभाऊ ठाकरे उपस्थित हाेते.

ग्राम पंचायत कार्यालय, जाेगीसाखरा : प्रजासत्ताक दिनानिमित्त तंमुस अध्यक्ष अंबरदास कांबळी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य वृंदा गजभिये, ग्रा. पं. सदस्य संदीप ठाकुर, गुरूदेव कुमरे, देविदास ठाकरे, स्वप्निल गरफडे, वैशाली चापले, ज्याेती घुटके, करिश्मा मानकर, प्रतिभा माेहुर्ले, अश्विनी घाेडाम, ग्रामसेवक एन. डी. तेलंग, पाेलीस पाटील राधा सडमाके, मुख्याध्यापक दादाजी साेरते, प्राचार्य कृष्णा खरकाटे यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.

जि. प. शाळा, अडपल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भावना बाबनवाडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी विनाेद वासमवार, शाेभ वासमवार, वर्षा भोयर, सरीता चौधरी, हरी सेमस्कर, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य रवी भोयर, सुनील गेडाम, कैलास पोटे, कल्पना मुलताने, माजी सदस्य जितेंद्र मुप्पीडवार, माजी उपसरपंच खुशाल पोटे, ग्रामविस्तार अधिकारी गाेपीचंद बोरकुटे रोशन शेंडे, अंगणवाडी सेविका चंद्रकला शेंडे, चंदू राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष अभयपुरी मुलताने, पोलीस पाटील सपना रायपुरे उपस्थित होते. याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून तंबाखुमुक्तीची शपथ देण्यात आली. त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालय व मुख्यध्वजाचे ध्वजारोहण अभयपुरी मुलताने यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन प्रमोद खांडेकर तर प्रास्ताविक कैलाश कोरोटे यांनी केले.

Web Title: Republic Day is celebrated everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.