मुख्याध्यापकांची फेरनियुक्ती करा
By Admin | Updated: May 31, 2015 01:20 IST2015-05-31T01:20:57+5:302015-05-31T01:20:57+5:30
परिसरातील निकतवाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी. आर. गणवीर यांची निकतवाडा येथे फेरनियुक्ती करावी, ...

मुख्याध्यापकांची फेरनियुक्ती करा
ठराव : शाळा व्यवस्थापन समितीची मागणी
घोट : परिसरातील निकतवाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी. आर. गणवीर यांची निकतवाडा येथे फेरनियुक्ती करावी, असा ठराव शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक -पालक नियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सदर सभा बुधवारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र साकटवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
मुख्याध्यापक गणवीर यांची तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोटेपल्ली येथे ४ फेबु्रवारी रोजी नेमणूक करण्यात आली. त्यांना सत्र संपण्यापूर्वी निकतवाडा येथे परत पाठविणे आवश्यक असतानाही परत पाठविण्यात आले नाही. निकतवाडा येथे १ ली ते ५ वी पर्यंत वर्ग असून एकूण ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटसंख्येनुसार या शाळेत तीन शिक्षक अनिवार्य आहेत. या शाळेत कार्यरत असलेले वाय. डब्ल्यू. मांदाळे यांची सुद्धा दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे आता सध्या आर. डब्ल्यू. शेडमाके या एकच शिक्षिका आहेत. त्यामुळे गणवीर यांना परत पाठविण्याची मागणी आहे.