अहेरीतील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:39 IST2021-08-26T04:39:08+5:302021-08-26T04:39:08+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार यांनी अहेरी शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २४ ऑगस्ट ...

Repair internal roads in Aheri | अहेरीतील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा

अहेरीतील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार यांनी अहेरी शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २४ ऑगस्ट रोजी दिले. निवेदन रा.काँ.चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, माजी नगरसेवक शैलेश पटवर्धन, मखमूर शेख, आफ्रिदी सय्यद, विनोद रामटेके, सुमित मोतकुरवार, बालाजी गावडे, मांतय्या आत्राम आदींनी दिले. सदर निवेदनाची दखल घेऊन आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांना कार्यालयात बोलावून तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी करण्याबाबत सूचना दिली. यावर अभियंता अतुल मेश्राम यांनी लवकरच कामाला प्रारंभ करून रस्त्यांची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले. आता लवकरच अहेरी-आलापल्ली-महागाव व अन्य मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

240821\5816img-20210824-wa0087.jpg

रांका कार्यकर्ते रस्ता दुरुस्ती साठी निवेदन देतांना

Web Title: Repair internal roads in Aheri