रेपनपल्लीत होणार जलसाठवण केंद्र
By Admin | Updated: January 17, 2017 00:44 IST2017-01-17T00:44:50+5:302017-01-17T00:44:50+5:30
सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांंतर्गत तालुक्यातील रेपनपल्ली येथे पाणीसाठवण केंद्र निर्माण केले जाणार असून या कामाचे भूमिपूजन १५ जानेवारी रोजी करण्यात आले.

रेपनपल्लीत होणार जलसाठवण केंद्र
भूमिपूजन : सीआरपीएफच्या ९ बटालीयनचा पुढाकार
अहेरी : सिव्हीक अॅक्शन कार्यक्रमांंतर्गत तालुक्यातील रेपनपल्ली येथे पाणीसाठवण केंद्र निर्माण केले जाणार असून या कामाचे भूमिपूजन १५ जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी सीआरपीएफ बटालीयन ९ चे कमांडंट राजेंद्र प्रसाद, सरपंच ईश्वरी गेडाम, सहायक कमांडंट सचिनकुमार, निरीक्षक भरतसिंह, पीएसआय विठ्ठल दुरपडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट राजेंद्र प्रसाद म्हणाले, जमिनीतील पाण्याची पातळी उन्हाळ्यातही टिकवून ठेवण्यासाठी भूमिगत जलसंचय निर्मिती होणे आवश्यक आहे. भविष्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय करू नये, असे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कविता, वर्णमाला व अंकलिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली. सरपंच ईश्वरी गेडाम यांनी मार्गदर्शन करताना सीआरपीएफचे जवान जनतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर आहेत. त्याचबरोबर समाजसेवेचेही काम करीत आहेत. नागरिकांनीही त्यांना मदत करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला रेपनपल्ली येथीलही नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)