देसाईगंज मार्गाचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:04 IST2017-10-18T00:04:40+5:302017-10-18T00:04:51+5:30
कोंढाळा ते आरमोरी दरम्यानचा दोन किमीचा मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

देसाईगंज मार्गाचे नूतनीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : कोंढाळा ते आरमोरी दरम्यानचा दोन किमीचा मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पावसाळ्यात याच परिसरात दोन वाघांची दहशत होती. अशातच मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले होते. सदर मार्ग राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीचे काम करण्याची जबाबदारी राष्टÑीय विकास महामार्ग प्राधिकरणाची आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती झाली नव्हती. खड्ड्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले होते. विशेष करून कोंढाळा ते आरमोरीदरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात केली आहे. आरमोरी ते देसाईगंज दरम्यानच्या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र दोन किमीचा हा मार्ग राहून गेला होता. पावसाळ्यामध्ये पुन्हा सदर मार्ग खराब झाला. नागरिकांकडून सातत्याने मागणी झाल्यानंतर मार्ग दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. देसाईगंज येथील बाजारपेठ जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दरम्यान गर्दी वाढते. पावसाळ्यापूर्वी दुरूस्त केलेल्या काही मार्गावर खड्डे पडले आहेत. सदर खड्डे सुद्धा दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी आहे.