Renew Reggae Road | रेगडी मार्गाचे नूतनीकरण करा

रेगडी मार्गाचे नूतनीकरण करा

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : २२ वर्षांपूर्वी झाले होते बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : घोट-रेगडी या मार्गाचे २२ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. तेव्हापासून रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात आहे. पूर्वीपेक्षा या मार्गाने वाहतूक प्रचंड वाढली आहे. आधीच अरूंद असलेला हा मार्ग वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रेगडी-घोट मार्गावरील वाहतूक पूर्वीपेक्षा १० पटीने वाढली आहे. रस्ता अरूंद असल्याने येथे किरकोळ अपघात घडत आहेत. यात अनेक वाहनधारकांना जीव गमवावा लागत आहे. हा मार्ग अरूंद असून घोट ते माडेआमगाव फाट्यापर्यंत पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. येथून आवागमन करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सदर मार्गाचे नूतनीकरण करण्याऐवजी दरवर्षी केवळ डागडुजी करून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे रूंदीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Renew Reggae Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.