वनहक्काचे प्रस्ताव निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:06 IST2017-11-11T00:06:22+5:302017-11-11T00:06:35+5:30
अनुसूचित जमाती व इतर वनवासी पारंपरिक वनहक्क दावे रखडले असून सदर दावे निकाली काढावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे केली आहे.

वनहक्काचे प्रस्ताव निकाली काढा
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : अनुसूचित जमाती व इतर वनवासी पारंपरिक वनहक्क दावे रखडले असून सदर दावे निकाली काढावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे केली आहे.
वनहक्क दावे अधिनियम २००६ व नियम २००८ प्रमाणे, सन २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात वनहक्क दावे निकाली काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो नागरिकांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. मात्र काही नागरिकांच्या अर्जामध्ये त्रुटी असल्याने सदर प्रस्ताव वापस पाठविण्यात आले. वापस आलेले प्रस्तावाला शेतकºयांनी आवश्यक ते पुरावे जोडले आहेत. मात्र सदर प्रस्ताव आता अहेरी तहसील कार्यालयातच पडून आहेत. तालुक्यातील सर्व प्रकरणे निकाली काढण्याकरिता उपविभागीय अधिकाºयांनी स्वत: पुढाकार घ्यावा, सदर प्रकरणे समितीकडे पाठवावे, असे आवाहन केले आहे. २००९ नंतर दावे निकाली काढण्याची मोहीम थंडावली आहे. या मोहिमेला पुन्हा गती द्यावी, अशी मागणी होत आहे.