शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रोजगार निर्मितीमधील सर्व अडथळे दूर करणार; गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:12 IST

गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहिल्यांदाच गडचिरोलीत आले.

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीतून उद्योगाला चालना मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती होण्यास वाव आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही आपण त्यांच्याची चर्चा करणार असून या कामातील सर्व अडथळे लवकरात लवकर दूर करून रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा केला जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहिल्यांदाच गडचिरोलीत आले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे होते. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पो.अधीक्षक मोहीत गर्ग, अजय बंसल, सुदर्शन या अधिकाºयांची त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले.

सर्वप्रथम गृहमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. त्यानंतर जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियान आणि पोलिसांकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती गृहमंत्र्यांना अधिकाºयांनी दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गृहमंत्री शिंदे म्हणाले, नक्षल चळवळीमुळे जिल्ह्यातील विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. आता अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा प्रशासन सर्वंकष योजनांची अंमलबजावणी करु न विकास कामे गतीने करीत आहे. नक्षल चळवळीत येथील स्थानिक युवकांचा समावेश आहे. अशा भरकटलेल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहेत.

नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरवून त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही याचीही दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी रोजगाराची निर्मिती करणे काळाची गरज असून याशिवाय युवक मुख्य प्रवाहात येणार नाही. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विद्युत, कृषिवर आधारित उद्योग यावर भर देण्यात येईल असेही शिंदे म्हणाले.

जिल्हयात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करु न देताना मोठया प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्प तयार करण्याचा शासन विचार करीत आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच शेतात उत्पन्न झालेल्या धान्याला योग्य भाव मिळेल अशा आधारभूत किमती निश्चित करण्यात येतील, असे गृहमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात रस्त्यांची वाईट अवस्था आहे. कंत्राटदाराच कामाचा दर्जा चांगला असावा आणि कामाचा वेग वाढावा यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले. बिआरओच्या कामाप्रमाणे प्रलंबित राहीलेल्या तस्त्यांची, पुलांची कामे प्राधान्याने पुर्ण करु न दळणवळण व्यवस्था चांगली करु न देणार असल्याचे ते म्हणाले.पदभरतीमधील अडचणींसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलणार

जिल्ह्यात सुधारित बिंदूनामावलीचा आदेश आणि त्याला लगेच दिलेली स्थागिती यामुळे पदभरतीबाबत गोंधळ सुरू आहे. तो दूर करून पोलीस व इतर पदभरतीचा मार्ग दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे आश्वासन ना.शिंदे यांनी दिले. पोलीस विभागाला जे हवं ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे गृहमंत्री म्हणाले.शहीद जवानांना आदरांजली

गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद पोलिसांच्या स्मारकावर पुष्पचक्र  अर्पण करु न शहीद जवानांना आदरांजली वाहीली. बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने गोडलवाही येथील उपपोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर ते नागपूरकडे रवाना झाले. हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारीही आले होते.आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची गरज

जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचे ना.शिंदे म्हणाले. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकाºयांनी मुख्यालयी राहून सेवा द्यावी यासाठी त्यांना विशेष भत्ता देण्यात येईल. एक विशेष बाब म्हणून वैद्यकीय अधिकाºयांची स्थानिक स्तरावर कंत्राटी नियुक्तीही केली जात आहे. त्यांना अतिरिक्त मोबदला मिळत असल्याने आरोग्याची समस्या दूर होण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाGadchiroliगडचिरोली