लोकमत कालदर्शिकेचे गडचिरोलीत थाटात विमोचन

By Admin | Updated: November 29, 2015 02:15 IST2015-11-29T02:15:37+5:302015-11-29T02:15:37+5:30

अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून अफाट लोकप्रियता मिळविलेल्या लोकमत कालदर्शिकेचा विमोचन सोहळा शनिवारी लोकमत गडचिरोली जिल्हा कार्यालयात पार पडला.

Released in Lokmat Kaladarshak's Gadchiroli Thatta | लोकमत कालदर्शिकेचे गडचिरोलीत थाटात विमोचन

लोकमत कालदर्शिकेचे गडचिरोलीत थाटात विमोचन

मान्यवरांचे गौरवोद्गार : समाजातील सर्व घटकांच्या हितांचा समावेश
गडचिरोली : अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून अफाट लोकप्रियता मिळविलेल्या लोकमत कालदर्शिकेचा विमोचन सोहळा शनिवारी लोकमत गडचिरोली जिल्हा कार्यालयात पार पडला.
विमोचन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ. साळवे इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग कॉलेज चातगावचे संस्थापक प्राचार्य डॉ. प्रमोद साळवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, जिल्हा सचिव अविनाश महाजन, लोकमतचे गडचिरोली येथील प्रमुख वितरक श्रीकांत पतरंगे आदी उपस्थित होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा लोकमत कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन होते.
विमोचन सोहळ्यात मान्यवरांनी लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते २०१६ या वर्षाच्या लोकमत कालदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
लोकमत कालदर्शिकेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे. समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून या कालदर्शिकेला तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या घराघरांत ही कालदर्शिका पोहोचली, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Released in Lokmat Kaladarshak's Gadchiroli Thatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.