गडचिरोली जिल्हा घडीपुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
By Admin | Updated: November 23, 2015 01:20 IST2015-11-23T01:20:16+5:302015-11-23T01:20:16+5:30
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत आठ पानी विशेष घडीपुस्तिका प्रकाशित केली ...

गडचिरोली जिल्हा घडीपुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
आठपानी सचित्र पुस्तिका : जिल्हा विकासाची माहिती
गडचिरोली : जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत आठ पानी विशेष घडीपुस्तिका प्रकाशित केली असून या पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील तोडाबा येथील मोहर्ली या गावात वन विभागाच्या मार्फतीने आयोजित कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला शनिवारी मुख्यमंत्री आले होते. याप्रसंगी या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
यावेळी राज्याचे वित्त व नियोजन तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, संजय धोटे, कीर्तीकुमार भांगडिया, महापौर राखी कंचर्लावार, प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. निगम, भगवान, गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. गडचिरोली जिल्ह्यात येत्या काही दिवसात वनांवर आधारीत उद्योग तसेच खाण उद्योग सुरू केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली. (नगर प्रतिनिधी)