कुरखेडात हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:05 IST2017-03-03T01:05:29+5:302017-03-03T01:05:29+5:30
कुरखेडा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले.

कुरखेडात हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण
आमदार उपस्थित : नगरभवनाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार क्रिष्णा गजबे यांनी केले. स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील प्रमुख ११ ठिकाणी लावण्यात आलेल्या हायमॉस्ट दिव्यांचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
स्थानिक गांधी चौकात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल होते. ग्रामीण क्षेत्राप्रमाणे नगर पंचायत क्षेत्रात सुध्दा रोजगार हमी योजना व शेती विषयक योजनांची अंमलबजावणी करण्यास शासन सकारात्मक असून यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार गजबे यांनी यावेळी सांगितले. याशिवाय प्रत्येक तालुकास्तरावरील नवनिर्मित नगर पंचायत भवनाच्या बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे कार्य शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती आमदार गजबे यांनी दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, गटनेते व पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, बांधकाम सभापती सोनू भट्टड, नगरसेवक बबलूभाई हुसैनी, अॅड. उमेश वालदे, पुंडलिक देशमुख, मनोज सिडाम, नगरसेविका शाहीदा मुगल, नंदिनी दखणे, दिपाली देशमुख, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता उजवणे, कंत्राटदार कुंभारे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते हायमास्ट दिव्याची कळ दाबून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांनी प्रास्ताविकेतून शहरातून आतापर्यंत झालेल्या व प्रस्तावित विकासकामांची चर्चा करून यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदारांकडे केली. कार्यक्रमाचे संचालन पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी तर आभार मुख्याधिकारी मयूर भूजबळ यांनी मानले. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.