विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:28 IST2021-07-17T04:28:03+5:302021-07-17T04:28:03+5:30
पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंबंधीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ...

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा
पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात शुक्रवारी शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंबंधीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
विभागीय शिक्षण मंडळांनी १० व १२वीच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसुल केले, परंतु या परीक्षा रद्द झाल्या आणि विद्यार्थ्यांचे गुणांकन संबंधित शाळांनीच केले. त्यामुळे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना त्वरित परत करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यासोबतच आरटीईअंतर्गत शिक्षणाची सवलत १२व्या वर्गापर्यंत वाढविण्यात यावी, बार्टीचे केंद्र गडचिरोली येथे सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासी सोयीसह उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व तत्सम प्रशिक्षण देण्यात यावे, कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्यात यावे, कोरोना काळातील गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांचे विद्युत बिल माफ करण्यात यावे, कोरोना संसर्गामुळे बंद असलेला शाळा-महाविद्यालये त्वरित सुरू करून शैक्षणिक नुकसान थांबवावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सल्लागार प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदिरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपूर, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे जिल्हा महासचिव धर्मेंद्र वंजारे, अमोल खोवे आदी उपस्थित होते.