समुपदेशकांची मानधन कपात

By Admin | Updated: December 23, 2016 01:05 IST2016-12-23T01:05:59+5:302016-12-23T01:05:59+5:30

राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमात (एनसीडी) समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे

Reduction of counselors | समुपदेशकांची मानधन कपात

समुपदेशकांची मानधन कपात

एनसीडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष : पाच महिन्यांपासून ४ हजार २०८ रूपयांचे नुकसान
गडचिरोली : राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमात (एनसीडी) समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधनात सप्टेंबर २०१६ पासून सुमारे ४ हजार २०८ रूपयांची कपात केल्याने एनसीडी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम सद्य:स्थितीत १७ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे. सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामध्ये समुपदेशक कार्यरत आहेत. या समुपदेशकांची नियुक्ती जुलै २०१२ पासून करण्यात आली. नियुक्तीच्या वेळेस त्यांना १२ हजार रूपये मानधन देण्यात येत होते. त्यानंतर २०१४-१५ मध्ये ८ टक्के व २०१५-१६ मध्ये ५ टक्के मानधन वाढ देण्यात आली. आॅगस्ट २०१६ पर्यंत त्यांना एकूण १४ हजार २०८ रूपये मानधन दिले जात होते. मात्र २०१६-१७ च्या पीआयपीमध्ये अचानक समुपदेशक यांचे मानधन ४ हजार २०८ रूपयांनी कमी करण्यात आले व त्यांना केवळ १० हजार रूपये एवढेच मानधन दिले जात आहे. वाढत्या महागाईनुसार मानधन वाढण्याऐवजी ते कमी करण्यात आले. सदर कार्यक्रमाअंतर्गत समुपदेशक पदाचे मानधन प्रस्तावित पीआयपीमध्ये चुकीने तर कमी करण्यात आले नाही, अशी शंका कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटासह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. सप्टेंबर २०१६ पासून ४ हजार २०८ रूपये कपात करून ५ ते ६ हजार रूपये मानधन समूपदेशकांच्या हातात भेटत असल्याने अत्यल्प मानधनावर काम कसे करावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. एनसीडी कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टॉप नर्स, प्रयोगशाळा समुपदेशक यांचा समावेश असून केवळ समुपदेशकांचे मानधन कमी का करण्यात आले, याचे कारण अद्यापही शासनामार्फत कळविण्यात आले नाही. इतर राष्ट्रीय कार्यक्रमातील समुपदेशक अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यांचे मानधन कपात न करता त्यांना मानधन देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

सहसंचालकांचे केवळ आश्वासन
एनसीडी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, याकरिता २३ आॅक्टोबरला आरोग्य भवन मुंबई येथे सहसंचालक (असंसर्गजन्य रोग) डॉ. साधना तायडे यांची भेट घेण्यात आली असता, सदर मानधन केंद्रावरून कमी करण्यात आले आहे, त्यानुसार आम्ही सुधारित पीआयपी केंद्राकडे परत पाठविलेली आहे व सुधारित पीआयपी मंजूर झाल्यास पूर्ववत मानधन समुपदेशकांना देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: Reduction of counselors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.