८७ लाख रूपयांच्या करमणूक कराची वसुली
By Admin | Updated: April 1, 2015 01:35 IST2015-04-01T01:35:29+5:302015-04-01T01:35:29+5:30
जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने यावर्षी सुमारे ८७ लाख ४१ हजार रूपयांचा करमणूक कर गोळा केला आहे.

८७ लाख रूपयांच्या करमणूक कराची वसुली
गडचिरोली : जिल्हा करमणूक कर विभागाच्या वतीने यावर्षी सुमारे ८७ लाख ४१ हजार रूपयांचा करमणूक कर गोळा केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १३ हजार ५०० केबल ग्राहक आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ३ हजार ९११, धानोरा ८७, चामोर्शी २ हजार ५१९, मुलचेरा ०, देसाईगंज २ हजार ४०२, आरमोरी १ हजार ४१४, कुरखेडा ४९२, कोरची ०, अहेरी १ हजार ९४०, भामरागड १६०, एटापल्ली १९० व सिरोंचा तालुक्यात ४०६ केबल ग्राहक आहेत. त्याचप्रमाणे ६ हजार १५८ डीटीएच, ६ हजार ९४१ टाटास्कॉय, ३३६ रिलायन्स, २ हजार १८ सन टीव्ही, १ हजार २४५ एअरटेल, ३ हजार ९७६ भारत बिजनेस कंपनीच्या डिश आहेत. अशा एकूण २० हजार ६७४ डिश आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ७१ केबल चालक आहेत. या केबल चालकांच्या मदतीने करमणूक कर भरल्या जाते. नगर परिषद क्षेत्रात ३० टक्के तर ग्रामीण भागात १५ टक्के करमणूक कर आकारल्या जाते.
गडचिरोली जिल्ह्याला २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी रूपयांचा कर गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत ८७ लाख ४१ हजार रूपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. टक्केवारीचे प्रमाणही ८७.४१ टक्के एवढे आहे. विदर्भातील इतर सर्व जिल्ह्याचे करमणूक कर गोळा होण्याचे प्रमाण ९० टक्केपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्हा मागे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात केबल व डिश टीव्हींची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत करमणूक कर अत्यंत कमी प्रमाणात गोळा होतो.
कोरची व मुलचेरा तालुक्यात एकही केबल कनेक्शन नाही. त्यामुळे या दोन तालुक्यातून केबलच्या माध्यमातून रूपयाचेही उत्पन्न प्राप्त होत नाही. संपूर्ण जिल्ह्यात केवळ एक चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहातूनही अत्यंत कमी प्रमाणात करमणूक कर गोळा होते. त्यामुळे वर्षभरात कोटीचाही महसूल गोळा होत नाही. (नगर प्रतिनिधी)