नक्षलग्रस्त संवदेशनशील गावात विक्रमी मतदान
By Admin | Updated: October 16, 2014 23:24 IST2014-10-16T23:24:27+5:302014-10-16T23:24:27+5:30
नक्षल्यांनी बॅनर व पत्रकाच्या माध्यमातून लोकशाहीला विरोध दर्शवून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या सावटाखाली असलेल्या निवडणुकीत कुरखेडा तालुक्यातील

नक्षलग्रस्त संवदेशनशील गावात विक्रमी मतदान
कुरखेडा : नक्षल्यांनी बॅनर व पत्रकाच्या माध्यमातून लोकशाहीला विरोध दर्शवून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले होते. नक्षल्यांच्या सावटाखाली असलेल्या निवडणुकीत कुरखेडा तालुक्यातील नक्षलग्रस्त संवेदनशील गावातील १६ मतदान केंद्रांवर विक्रमी मतदान झाले.
कुरखेडा तालुक्यातील चरवीदंड येथील मतदान केंद्रावर एकुण ६०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये ३२८ पुरूष व २७४ महिला मतदारांचा समावेश आहे. या गावतील मतदानाची टक्केवारी ७९ आहे. कातलवाडा या गावातील केंद्रावर पुरूष ३६५ व महिला ३२६ असे एकुण ६९१ मतदारांनी मतदान केले. या गावात ७६.३५ टक्के मतदान झाले आहे. खोब्रामेंढा या गावात पुरूष १४६ व महिला १४० असे एकुण २८६ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविला. येथील मतदानाची टक्केवारी ७२ आहे. खामतळा येथे एकुण ४८० मतदारांनी मतदान केले असून येथील टक्केवारी ७९ आहे. मालेवाडा येथे ८१.४४ टक्के, रानवाही येथे ८३.५४ टक्के, देवसरा येथे ७४ टक्के, अंगारा येथे ७३.३१, नवेझरी येथे ७९.८८, खडकी येथे ७८.८८, मुस्का येथे ७३.३८, खांबाळा येथे ६८, इरूपटोला येथे ७६.४३, सुरसुंडी येथे ६९.४४, मुरमाडीत ६३.४८, दराची येथे ५१.९१ टक्के मतदान झाले.