विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मान्यता

By Admin | Updated: September 4, 2014 23:48 IST2014-09-04T23:48:57+5:302014-09-04T23:48:57+5:30

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले असून या विभागाकरीता

Recognition of university professors | विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मान्यता

विद्यापीठातील प्राध्यापक भरतीला मान्यता

गडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले असून या विभागाकरीता प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
पदव्युत्तर विभागातील शैक्षणिक वाटचालीला गती देण्यासाठी लवकरच प्राध्यापकांची मंजूर झालेली पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे. गोंडवाना विद्यापीठात, इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र, वाणिज्य व गणित असे पाच पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आले आहेत. या पदव्युत्तर विभागाकरीता १५ प्राध्यापकांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ५ पदे प्राध्यापक व १० पदे सहयोग प्राध्यापकांची भरावयाची आहे. या पदासाठी येणाऱ्या १ कोटी ४७ लाख रूपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली आहे. शासनाच्या उच्च व तंत्रविभागाकडून पदभरती संदर्भात शासन पत्रक काढल्यानंतर शासन निकषानुसार पदव्युत्तर विभागासाठी सदर १५ प्राध्यापकांची पदे भरण्यात येणार आहे. त्यानंतर पदव्युत्तर विभागाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Recognition of university professors