हायवे विस्तारावर जनमत जाणणार
By Admin | Updated: January 15, 2016 02:06 IST2016-01-15T02:06:52+5:302016-01-15T02:06:52+5:30
राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर अंतर्गत येणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया- कोहमारा, राज्य महामार्ग...

हायवे विस्तारावर जनमत जाणणार
आरमोरी, देसाईगंजला सभा : राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी येणार
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूर अंतर्गत येणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ७५३ गोंदिया- कोहमारा, राज्य महामार्ग क्रमांक ३५३ सी साकोली- गडचिरोली या रस्त्यांचे दुपदरीकरण, चौपदरीकरण (दोन्ही बाजुस बाजपट्ट्यासह) दजोन्नत करण्याचे प्रस्तावित आहे. या संबंधी प्रकल्पाची माहिती देण्याकरिता प्रत्येक प्रकल्पाबद्दलचे लोकमत जाणून घेण्याकरिता सार्वजनिक सभेचे आयोजन १८ जानेवारी रोजी आरमोरी येथील राजीव भवनात सकाळी १०.३० वाजता व त्याच दिवशी देसाईगंज येथील सांस्कृतिक भवनात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आले आहे. आरमोरी येथील सभेला गडचिरोली व आरमोरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे व देसाईगंज येथील सभेला देसाईगंज तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभाग नागपूरचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. ज्या गावांमधून व ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. अशा शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. (नगर प्रतिनिधी)